1.हाइट ऑफ फॅशन : 'झिप'वालं धोतर!!!
२.परमोच्च गुप्तता : कोरं व्हिजिटिंग कार्ड!!!
3.आळशीपणाची हद्द : मूल दत्तक घेणे!!!
4.सक्रीय आळशीपणाची हद्द : मॉनिर्ंग वॉकवरून परतताना लिफ्ट घेणं!!!
५.चक्रमपणाची हद्द : कोऱ्या कागदाच्या झेरॉक्स काढणं.
६.परमोच्च विसराळूपणा : आरशात पाहून 'हा चेहरा पाहिलाय कधीतरी, कुठे बरं...' असा विचार मनात येणं!!!
७.बिनडोकपणाची हद्द : काचेच्या दरवाजाच्या कीहोलमधून पाहणं!
८.प्रामाणिकपणाची हद्द : गरोदर बाईनं दीड तिकीट घेणं!!!
९.डिहायड्रेशनची हद्द : गाईनं दुधाऐवजी 'मिल्क पावडर' देणं!!!
........................
हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलंय, काही कल्पना आहे का?...
... अहो, परवा आपल्या स्वयंसिद्ध बापूंचं प्रवचन सुरू असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहून मला एवढा धक्का बसला की बिअरचा कॅन खालीच पडला ना माझ्या
Wednesday, April 11, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment