Tuesday, April 24, 2007

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली.

त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात.

तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात.

त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, '' साला लाइन मारतोय बघ!''

ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री.

ती रडली, तर ती म्हणेल ते खरे.

तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे.

मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक.

मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक.

मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत.

मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच.

तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात.

त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला... तुम्हाला माहितीये काय म्हणतात!!!

Tuesday, April 17, 2007

Admi ko kya chaiye?
1 aurat jo pyar de
1 aurt jo achha khana banaye
1 aurt jo paisa kamaye
::aur::
Aisa naseeb ki tino aurte ek dusre se na mile
------------------------
Aap apni jindagi me Itna aage jao..
Itna aage jao..
Itna aage jao..
K aapko log kahe
Jao baba aage jao..
*GOOD LUCK*
------------------------
Girl:if u'll try to kiss me Mai shor macha dungi.
Boy:lekin-yaha to door-door tak koi nahi hai.
Girl:i know but formality to karni hi padegi.

Sunday, April 15, 2007

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.

न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?"

त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला"
सुटीसाठी गावी गेलेला शिऱ्या देवळाशेजारच्या मैदानात क्रिकेटची प्रॅक्टिस करत होता आणि आबा देवळाच्या पडवीतून ती पाहात होते. आपण स्क्वेअर कट कसा एलिगंट मारतो, फ्लिक काय सुरेख करतो, रिव्हर्स स्वीपमध्ये तर कसे मास्टर आहोत, असं अॅक्शन करीत सांगून सांगून त्यानं आबांना जाम पकवलं.

धोतराचा सोगा सावरत खाली उतरून आबा म्हणाले, ''शिऱ्या, तू मला ह्या बॅटिंगच्या गमजा सांगू नकोस. आमच्या काळात सीके नायडू जाम फॉर्मात होता. आम्ही सारे त्याचे भक्त. हे समोरचं आंब्याचं झाड आहे ना! त्याच्या शेंड्यावरून सिक्सर मारायचो आम्ही त्या काळात. ते करून दाखवशील, तर तू खरा बॅट्समन!''

झालं... शिऱ्या पेटला. उंच, डेरेदार आंब्याच्या झाडावरून सिक्सर मारण्यासाठी त्यानं जिवाचा आटापिटा केला. पण, बॉल फांद्यांत आपटून, एखादी कैरी तोडून खाली पडायचा.

तासाभरानंतर दमछाक झालेला, वैतागलेला शिऱ्या गप्पपणे आबांबरोबर घराकडे निघाला, तेव्हा आबा खुसुखुसू हसत म्हणाले, ''अरे शिऱ्या. मघाशी तुला एक सांगायचं राहूनच गेलं. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा ते आंब्याचं झाडही लहानच

होतं... चार फुटांचं!!!!''

Wednesday, April 11, 2007

शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात
कळलंच नाही, 'काय बघितलं होतं कुलंकर्ण्याच्या हेमात?
कुलंकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं
नाकावरती सोडावॉटर आणि मागे वेण्या दोन
वारं आलं तर उडून जाईल अशी तिची काया
रूप पक्क काकूबाई... पण अभ्यासावर माया
गॅदरिंगमध्ये एकदा तिनं गायलं होतं गाणं
तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं
नारळीपौर्णिमेला तिनं मला नारळीभात वाढला होता
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता
नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली
शाळेमधील प्रेमकहाणी शाळेमध्येच विरून गेली
थोड्याच दिवसांत वेगळं व्हायची वेळ आमच्य्यवर आली होती
मित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती
पुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं
पुढं हेमाचं काय झालं? हे विचारायचंच राहून गेलं
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली
'ओळखलंच नाही मी..' म्हटल्यावर खुदकन गालात हसली
आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय बदल झाला होता
चवळीच्या शेळेंला जणू आंब्याचा मोहोर आला होता
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती
सोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते
मंगळसुत्र मिरवत म्हणाली, "हे आमचे हे"
"बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्याला घे
बरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवऱ्यासमोर मलाच 'मामा' केलं होतं
म्हणून, आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात
शाळेत असतान मीही एकदा पडलो होतो प्रेमात..........
1.हाइट ऑफ फॅशन : 'झिप'वालं धोतर!!!

२.परमोच्च गुप्तता : कोरं व्हिजिटिंग कार्ड!!!

3.आळशीपणाची हद्द : मूल दत्तक घेणे!!!

4.सक्रीय आळशीपणाची हद्द : मॉनिर्ंग वॉकवरून परतताना लिफ्ट घेणं!!!

५.चक्रमपणाची हद्द : कोऱ्या कागदाच्या झेरॉक्स काढणं.

६.परमोच्च विसराळूपणा : आरशात पाहून 'हा चेहरा पाहिलाय कधीतरी, कुठे बरं...' असा विचार मनात येणं!!!

७.बिनडोकपणाची हद्द : काचेच्या दरवाजाच्या कीहोलमधून पाहणं!

८.प्रामाणिकपणाची हद्द : गरोदर बाईनं दीड तिकीट घेणं!!!

९.डिहायड्रेशनची हद्द : गाईनं दुधाऐवजी 'मिल्क पावडर' देणं!!!

........................

हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलंय, काही कल्पना आहे का?...

... अहो, परवा आपल्या स्वयंसिद्ध बापूंचं प्रवचन सुरू असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहून मला एवढा धक्का बसला की बिअरचा कॅन खालीच पडला ना माझ्या

Tuesday, April 10, 2007

1. A Foolish man tells a woman to STOP talking, but a WISE man tells her that she looks extremely BEAUTIFUL when her LIPS are CLOSED.

2. Three FASTEST means of Communication:
1. Tele-Phone
2. Tele-Vision
3. Tell to Woman
Need still FASTER - Tell her NOT to tell ANY ONE.

3. Let us be generous like this: Four Ants are moving through a forest.
They see an ELEPHANT coming towards them.
Ant 1 says: we should KILL him.
Ant 2 says: No, Let us break his Leg alone.
Ant 3 says: No, we will just throw him away from our path.
Ant 4 says: No, we will LEAVE him because he is ALONE and we are FOUR.

4. If you do NOT have a Girl Friend - You are missing SOME thing in your life.
If you HAVE a Girl Friend - You are missing EVERY thing in your life.


5. When your LIFE is in DARKNESS, PRAY GOD and ask him to free you from Darkness.
Even after you pray, if U R still in Darkness – Please PAY the ELECTRICITY BILL.